Bigboss मधील Suraj Chavan कोण आहे, बघा सविस्तर.(Suraj Chavan Biography)

Suraj Chavan Biography:मित्रानो सध्या चालू असलेल्या बिग बॉस मराठी मध्ये Suraj Chavan नावाचा हा Reels स्टार चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचे चांगलेच मनोरंजन करत काय. सूरज चव्हाण खरं तर हे नाव टिक टॉक वर खूप गाजलेल नाव आहे. टिक टॉक भारतात बंद झाल्या नंतर याची क्रेझ थोडी कमी झाली. मग नंतर हेच क्रेझ इंस्टाग्राम वर चालू झाली. तर हेच नाव आत्ता बिग बॉस मराठी मध्ये गाजत आहे. सुरज चव्हाण चे आत्ता सध्या इंस्टाग्राम वर 1.3 मिलियन फोल्लोवेर्स आहे. चला तर मग या टिक टॉक स्टार ची टिक टॉक ते बिग बॉस मराठी संपूर्ण कहाणी काय आहे ते पाहुयात.

नक्की कोण आहे Suraj Chavan?

सुरज चव्हाण हा मुळचा बारामती तालुक्यातील मोडवे गावचा आहे. तर तो सध्या त्याच गावात स्तित आहे. सुरजणे लहानपणीच आपापल्या आई आणि बाबांना गमावले. आणि तो लहानपणीच अनाथ झाला. सुरजचे आई-वडिलांच्या गेल्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या मोठ्या बहिणीने केला. आई-वडिल नाही म्हणजे अवघडच तसेच यामुळे सूरजला शाळेतही जात आले नाही,तर सूरज चे शिक्षनं हे आठवीपर्यंत झालेल आहे.तो लहानपणीच मोल मजुरी करत असत. त्यांनी काही काम केल तरच त्याला अन्न भेटत असत तर कधी कधी त्याची रात्रीच्या जेवणाची ही सोय होत नसायची.असे हलाकीचे दिवस सुरज ने काढलेले आहे.

कसा झाला Suraj Chavan स्टार?

सुरज चव्हाण च्या जीवनाला वळण लावणारे सर्वात मोठे साधन म्हणजे टिक टॉक,2019 मध्ये टिक टॉक ने सूरज च्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले, मोलमजुरी करत असताना एका दिवशी सुरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉक बद्दल सांगितले. त्यानंतर सुराजने टिक टॉक वर एक विडिओ पोस्ट केला, विशेष म्हणजे त्याचा तो विडिओ खूप व्हायरल झाला. ही गोष्ट सूरजला समजल्यानंतर त्यांनी मोलमजुरी करून एक स्मार्टफोन घेतला,आणि स्वतःचे टिक टॉक अकाउंट ओपन केले त्याला त्यावरती चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. मग त्यानेही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. पण थोड्याच दिवसात सुरज सोबत सर्वच टिक टॉक स्टार्स वर संकट आले, तर झाले असे कि भारतात कोरोना या रोगामुळे चीन च्या सर्व अँप्लिकेशन्स वर बंदी घालण्यात आले आणि त्यासोबतच भारतात टिक टॉकबंद झाले.

Suraj Chavan ची नवीन सुरवात


त्यानंतर सुरज ने हार ना मानता ने इंस्टाग्राम वर अकाउंट खोलले आणि तो तेथे व्हिडिओस पोस्ट करत गेला. टिक टॉक वर असणारे फोल्लोवेर्स त्याला इंस्टा वर फोल्लो करू लागले. इन्स्टा बरोबर सुरज Youtub वरती ही विडिओ बनवू लागला तसेच या माध्यमातून त्याने खूप पैसे कमावले. आणि त्याची संपूर्ण लाईफ बदलून गेली.तसेच सुरज फेमस झाल्या मुले त्याला नवनवीन दुकानांच्या उद्घाटनाच्या साठी बोलावले जाऊ लागले,सुराजने बिग बॉस मध्ये सांगितले कि त्याला एक रेबीन कापण्याचे 80 हजार रुपये देण्यात यायचे. Suraj Chavan चे सध्या इंस्टाग्राम वर 1 मिलियन पेक्षा जास्त फोल्लोवेर्स आहे.

Suraj Chavan किती पैसे कमावतो?

सुराजाने बिगबॉस मराठी मध्ये सांगितल्या प्रमाणे तो एखाद्या व्यवसायाच्या उद्घाटनचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमा ला जाण्यासाठी आणि रेबीन कापण्यासाठी तो 50-60 हजार रुपये घेतो. तसेच त्याचे इंस्टाग्राम वर १ मिलियन हून अधिक फोल्लोवर्स आहे, म्हणजेच तो प्रमोशन द्वारे लाखोंची कमाई करत असणार आहे. तसेच तो आपापल्या साथीनं बरोबर youtub वरती कॉमेडी व्हिडिओस बनवतो त्यातूनही त्याला चांगली कमाई होते. तसेच तो सध्या कलर्स टीव्ही च्या बिगबॉस मराठी शो मध्ये आलेला आहे, तर त्याला या शो मधून हि चांगले मानधन दिले जाईल. या सर्व गोष्टी चा विचार केला तर सुरज महिन्याला लाखोनची कामे करतो, तसेच त्याची संपूर्ण कमाई किती आहे याबाद्द्दल कोणती ही माहिती समोर आलेली नाही.

Suraj Chavan बिग बॉस मराठी

सध्या बिगबॉस मराठी असू किंवा हिंदी या मध्ये रील स्टार व Youtubers असो याना या शो मध्ये निवडले जात आहे. तसेच बिग बॉस मराठी मध्ये सुराजाची निवड करण्यात आली. सुरज सोशल मीडिया वरती जनतेचे खूप मनोरंजन करत आहे, हे पाहून याची निवड करण्यात आली आणि तो ज्या प्रकारे सोशल मीडिया वर मनोरंजन करत होता तसेच त्याने बिग बॉस मराठी मध्ये ही मनोरंजन चालू केले. त्याचे हटके डिलॉग्स ऐकण्यासाठीं प्रेक्षक त्याला पाहू लागले.

अशी झाली Suraj Chavan ची बिग बॉस मराठी मध्ये एन्ट्री


Read It Also https://aaplibatmi24.com/neeraj-chopra-biography/

Read more: Bigboss मधील Suraj Chavan कोण आहे, बघा सविस्तर.(Suraj Chavan Biography)

Leave a Comment