Vinesh Phogat Full Story in Marathi: कोण आहे विनेश फोगट या प्रश्नाचे उत्तर आज या लेखाच्या रूपात आम्ही घेऊन आलेलो आहोत.मित्रानो Vinesh Phogat ही भारतीय महिला कुस्तीपट्टू आहे. जिने 2018 साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तसेच 2020 मध्ये तिला भारतीय सर्वोच्च क्रीडा पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले होते. विनेश फोगट 9 वर्षांची असताना तिच्या वडिलांची जमीन वादात हत्या झाली होती. विनेश फोगट या महिला कुस्तीपट्टू चा संपूर्ण जीवनप्रवास खूपच खडतर झालेला आहे. वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले तसेच आनेक गोष्टीत तर मित्रानो आज या लेखातून आपण भारताच्या या कुस्तीपट्टू चा ऑलिम्पिक पर्यंत चा संपूर्ण प्रवास बघणार आहोत.
कॅटेगोरी | तपशील |
---|---|
पूर्ण नाव | विनेश विनोद फोगट |
जन्म तारीख | २५ ऑगस्ट १९९४ (वय २९) |
जन्मस्थान | बलाली, हरियाणा, भारत |
कुटुंब | विनोद फोगट आणि सरला देवी यांच्या मुली; महावीर सिंग फोगट (कोच) यांची भाची |
शिक्षण | राणी लक्ष्मीबाई स्कूल, रोहतक पास |
वैवाहिक स्थिती | अविवाहित |
प्रशिक्षक | महावीर सिंग फोगट (काका) |
प्रसिद्ध दुखापती | २०१६ रिओ ऑलंपिक्समध्ये ACL तुटली |
पुरस्कार आणि सन्मान | – अर्जुन पुरस्कार (२०१४) – पद्म श्री (२०२२) – लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डससाठी नामांकित (२०१९) |
सध्याची रँकिंग | ५३ किग्रा वर्गात वर्ल्ड नं. १ |
Vinesh Phogat जन्म
Vinesh Phogat हिचा जन्म 25 ऑगस्ट 1994 ला हरियाणा राज्यातील भिवंडी जिल्ह्यातील बलाली या गावामध्ये झालेला आहे. विनेश फोगाट घरातील मुलींनी जगभर आपल्या कामांमध्ये नाव कमावलं आहे. हिचे वडील राजपाल फोगाट यांना विनेश आणि प्रियंका या दोन मुली आहेत. तसेच विनेश फोगाट लहान असताना म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षी असताना राजपाल यादव यांची जमीन वादातून हत्या करण्यात आले होते. त्यानंतर राजपाल यादव यांचे भाऊ महावीर यादव यांनी गणेश आणि प्रियंका यांचा सांभाळ करत त्यांना कुस्तीच्या धडे दिले.
आमचे इतर लेख: https://aaplibatmi24.com/free-education-for-girl-in-maharashtra/
वयाच्या ९व्या वर्षी विनेश फोगाट चे वडील गेले सोडून
विनेश फोगाट ही 9 वर्षाची असताना तिने आपल्या वडलांना गमावले. तिच्या वडलांचे एका जमीन वादा मध्ये त्यांची हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर त्याचा व त्यांची आई प्रेमलता या सांभाळ त्यांच्या काकाने म्हणजेच महावीर फोगट यांनी केला जे किगीता, बबिता यांचे वडील यांचे वडील होते. त्यानंतर विनेश फोगाट हिने बहिणीसोबत कुस्ती चा सर्व केला . इथून तिच्या या यशस्वी करियर ची सुरुवात झाली. आणि ती कुस्ती क्षेत्रात प्रगती करत गेली .
विनेश फोगट ची आंतरराष्ट्रीय करियरला सुरूवात
Vinesh Phogat ही कुस्ती ची तयारी खूप जोमाने करत होती. तसेच ही जुनिअर स्तरावर चांगली कामगिरी करत होती. आणि अखेर तिला 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती खेळण्याची संधी मिळाली तसेच या स्पर्धेतूनच हिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. विनेशने फ्रीस्टाइल 52 किलोग्रॅम गटात कांस्यपदक जिंकले, तर त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.तसेच विनेश फोगाट बरोबर तिच्या बहिणींपैकी गीता, बबिता यांनीही वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदक जिकंले.
विनेश फोगट कारकीर्द
- 2013 आशियाई कुस्ती स्पर्धा
- 2013राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा
- 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
- 2014 आशियाई क्रीडा स्पर्धा
- 2015 आशियाई अजिंक्यस्पर्धा
- 2016 ऑलिम्पिक
- 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
- 2018आशियाई क्रीडा स्पर्धा
- 2020 उन्हाळी ऑलिंपिक
- 2024उन्हाळी ऑलिंपिक
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये विनेश फोगट ला झाली होती दुखापत
Vinesh Phogatआपल्या कुस्ती करियर मध्ये नेहमीच प्रगती करत होती. प्रत्येक आंतराष्ट्रीय खेळणं मध्ये ती सहभागी होत होती. तसेच 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 48 किलो वजनी गटामध्ये ती सहभागी झाली होती. पण तिचे दुर्दैव असेकी तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिचा सामन्यात पराभव झाला. तसेच त्यानंतर तिच्या गुडघ्या ची नंतर सर्जरी करावी लागली.या सर्व गोष्टीमुळे त्यावेळी विनेश नऊ महिने कुस्तीपासून दूर होती.त्यानंतर वेळा आली 2017 आशियाई चॅम्पियनशीप या चॅम्पियनशीप मध्ये तिने जोरदार कमबॅक करत रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर तिच्या या जिकंण्याचा गाडीला काय ब्रेक लागला नाही, तिने 2018 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं. तर 2018 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.
2018 मध्ये विनेश फोगट चा कुस्तीपटू शी झाला विवाह
Vinesh Phogatसाठी 2018 हे वर्ष विनेश फोगाट साठी खूपच चांगले ठरले या वर्षांमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकलं.तसेच तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि ती सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. या सर्व आनंदात भर टाकणारा आनंद म्हणजे तिचे तिच्या आवडत्या व्यक्ती जिंद जिल्ह्यातील सहकारी कुस्तीपटू सोमवीर राठी सोबत तिचा विवाह झाला. 13 डिसेंबर 2018 रोजी यांचा विवाह झाला. 2011 ला भारतीय रेल्वेमध्ये काम करत असताना या दोघांनची भेट झाली. त्यानंतर या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 2018 चे सुवर्णपदक जिंकून आल्यावर सोमवीरने तिला विमानतळावरच लग्नासाठी मागणी घालत अंगठी घातली आणि साखरपुडा केला.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये विनेश फोगट चा पराभव
2018 विजया नंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये विनेशचा पराभव 2019 मध्ये विनेश फोगाट ने कुस्ती चा वजन गट बदलला आणि ती 53 किलोमध्ये खेळायला लागली.त्यानंतर 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक ला सुरुवात झाली. त्या मध्ये सर्व देशवासियांचे लक्ष तिच्याकडे होते. तसेच देशवासीयांनी विनेशचं पदकही निश्चित मानलं जात होतं. अपेक्षे प्रमाणे तिने स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवून विजयी सुरुवात केली होती. पण पुढच्या फेरीमध्ये बेलारूसच्या व्हेनेसाने तिचा पराभव करत तिला बाहेर केलं. आणि करोडो भारतीयांचे स्वप्न त्यावेळी तुटले.
विनेश फोगटची पॅरिस ऑलिम्पिक 2024
Vinesh Phogat ने प्रत्यक्ष ऑलिम्पिकमधे चांगली कामगिरी केलेली आहे, त्याप्रमाणेच 2024 ऑलम्पिक मध्ये तिला एक उत्क्रुष्ट सुरुवात भेटली पहिल्याच सामन्यात चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या युई सुसाकि चा पराभव केला. 82-0 असा रेकॉर्ड असणाऱ्या युई सुसाकीचा विनेशने 3-2 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पाऊणतासानंतरच्या दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 ने पराभव करत सेमी फायनल गाठली. सेमी फायनलकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. या सामन्यातही विनेशने 5-0 ने सामना जिंकत क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव केला.
या विजयासह फायनलमध्ये जाणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती. त्यासोबतच या विजयाने भारताचे एक पदक निश्चित झालं होतं.फायनल सामना 7 ऑगस्ट ला होणार होता, या सामन्याला काही तास बाकी होते. सेमीफायनल सामना झाल्यानंतर विनेश ने छोटीशी मील खाल्ली होती. त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही वाढलं. त्यामुळे तिचे वजन100gm ने वाढले व याच गोष्टीने विनेशला या सुवर्णपदकापासून दूर केले. पॅरिस ऑलिम्पिकवरून आलेल्या अनेक बातम्यांनुसार तिने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. वजन कमी करण्यासाठी विनेशसह सर्व कोट आणि स्टाफनेही प्रयत्न केले. केस-नखे कापलीत, सायकलिंग केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण तिचे वजन 50.100 भरले आणि विनेश फोगाटसह करोडो भारतीयांनाच ऑलिम्पिकमध्ये अपात्र केलं गेलं. विनेशने पदक जरी मिळवंल नसलं तरी पोरगी वाघिणीसारखी लढली आणि फायनल गाठली. पदकापेक्षा विनेशने आपल्या खेळाच्या जोरावर प्रत्येक भारतीयाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण आहे.