WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Shahi Paneer Recipe: या पद्धतीने बनवा हॉटेल सारखे स्वादिष्ट पनीर घरच्या घरी.

Shahi Paneer Recipe:भारता मध्ये सर्वात आवडीने व आनंदाने खाला जाणारा पदार्थ म्हणजे पनीर. ही एक अतिशय लोकप्रिय भाजी आहे. ही प्रत्येक हॉटेल मध्ये खूप आवडीने खाल्ली जाते खुप महिलांची हॉटेल प्रमाणे आपल्या घरी ही भाजी करावी अशी इच्छा असते, यामध्ये याची एक खास रेसिपी म्हणजे हॉटेल सारखी “Shahi Paneer Recipe“, तुमच्या साठी खास या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत.

Shahi Paneer Recipe साठी लागणारी सर्व साहित्य

आवश्यक साहित्य
पनीर: 250 ग्रॅम
पनीर हा या रेसिपीचा मुख्य घटक आहे. तुम्ही ताज्या पनीरचा वापर करू शकता किंवा तुम्ही बाजारात उपलब्ध पनीर घेऊ शकता.

काजू-बादाम पेस्ट
काजू: 15-20
बादाम: 10-15
काजू आणि बादाम यांच्या पेस्टमुळे शाही पनीरला गोडसर चव येते.

मसाले आणि इतर घटक
कांदे: 2 मध्यम (बारीक चिरलेले)
टोमॅटो: 2 मोठे (सॉस केलेले)
आले-लसूण पेस्ट: 1 चमचा
धना पावडर: 1 चमचा
जीरे: 1/2 चमचा
मसाला: 1 चमचा (गरम मसाला)
कश्मीरी लाल मिरचं पावडर: 1 चमचा
क्रीम: 1/2 कप
तेल: 2-3 चमचे
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: सजावटीसाठी

Shahi Paneer Recipe बनवण्याची पुर्ण प्रोसेस

1.सर्वप्रथम काजू-बादाम पेस्ट तयार करणे
सर्वप्रथम, काजू आणि बादाम एका पाण्यात 15-20 मिनिटे भिजवून ठेवा. भिजल्यानंतर, त्यांना मिक्सरमध्ये टाका आणि थोडं पाणी घालून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट शाही पनीरच्या चवीसाठी आवश्यक आहे.

2.त्यानंतर मसाला तयार करणे
एका कढईत तेल गरम करा. त्यात जीरे टाका आणि त्याला थोडा तडतडल्यावर चिरलेले कांदे घाला. कांदे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घाला आणि थोडा वेळ परता, जेणेकरून ते कच्ये राहणार नाही.

3.टोमॅटोची तयारी
कांदा शिजल्यानंतर,टोमॅटो कापून ते मिक्सर मध्ये बारीक करून घायचे, व त्यानंतर बारीक केलेले टोमॅटो घाला आणि ते नरम होईपर्यंत शिजवा. टोमॅटोच्या पाण्यामुळे मिश्रणाला चव येईल आणि त्याला एक मऊ टेक्चर मिळेल.

4.त्यानंतर सर्व मसाले घालणे
टोमॅटो शिजल्यावर, त्यात धन्याची पावडर, कश्मीरी लाल मिरचं पावडर, आणि मीठ घाला. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करायचे आणि 5-7 मिनिटे मध्यम आचेवर शिजू घायचे जर आवश्यक असेल, तर थोडं पाणी घालून मिश्रणाला चांगले उकळा.

5.पनीर आणि काजू-बादाम पेस्ट
आता काजू-बादाम पेस्ट घाला आणि नीट परतुन घायचे. नंतर, पनीरचे तुकडे त्यात टाकायचे आहे. या टुकड्यांना चांगले मसाल्यात मिक्स होऊ द्या. नंतर, त्यामध्ये थोडे दूध घालुन ते चांगले हलवायचे आहे. हे मिश्रण मध्यम आचेवर 10 मिनिटे शिजवा, ज्यामुळे पनीर मसाल्यात चांगले मुरेल.

6.सजावट आणि सर्व्हिंग
शाही पनीर तयार झाल्यावर, त्यावर थोडी हिरवीगार कोथिंबीर बारीक करून वरतुन टाकायचे आहे. त्यानंतर ही भाजी गरमागरम नान, चपाती किंवा भातासोबततुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता.

    Shahi Paneer Recipe बद्दल काही टिप्स

    पनीरचे तुकडे: पनीरचे तुकडे गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा, त्यामुळे ते अधिक नरम होतील.
    मसालेदार आवडत असेल तर: जर तुम्हाला अधिक मसालेदार आवडत असेल, तर कश्मीरी मिरची जास्त प्रमाणात टाका.
    विविधता: शाही पनीरमध्ये वेगवेगळ्या भाज्या (जसे की वटणे , गाजर किंवा ब्रोकोली) घालून एक वेगळा स्वाद मिळवू शकता.

    निष्कर्ष
    Shahi Paneer Recipe एक खास भारतीय पदार्थ आहे जो आपल्या खास जेवणाचा अनुभव देतो. याची चव सर्वांना आवडते, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी एक उत्कृष्ट जेवण तयार करण्यासाठी आजच शाही पनीर बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्याचा आनंद घ्या!
    जर तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर खाली कमेंट करा किंवा तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला नक्की सांगा.

    Read It:Bharat Petroleum Recruitment 2024: भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदांसाठी भरती सुरू झाली आहे,बघा सविस्तर माहिती.

    Leave a Comment